Monday, 8 July 2013

भावना रुपी धरेला आता जपायला हवं...


भावना रुपी धरेला आता जपायला हवं....
आयुष्याच्या वेड्या वळणी मनाला सावरायला हवं....

रोजंच माडतो पसारा  मनाच्या घरात....
आठवणींच्या या पसाय्राला आता आवरायला हवं....

बालपणीच्या बागेत बागडलो मनसोक्त....
वास्तवाच्या जगती आता दौडायला हवं....

काळजाला तडे देणारे भेटतात सर्वजण....
कुणा आपल्यासोबत या तड्यांना सांधायला हवं....

प्रवासी तर नेहमी भेटतात चालताना....
कुणा परक्याला प्रेमाने आपलंस करायला हवं....

इमले स्वप्नांचे तर रोजच रचतो मनात....
घर प्रितीचं आता सईसाठी बांधायला हवं....

आयुष्यात हरत तर नेहमीच आलो....
कुणाच्या आशेसाठी आता जिँकायला हवं....

शब्दांच्या दाहकतेने दुर केले नात्यांना....
रेशमाच्या धाग्यांनी या नात्यांना आता विणायला हवं....

भावना रुपी धरेला आता सावरायला हवं....
आयुष्याच्या वेड्या वळणी सावरायला हवं....

---------------------
योगेंद्रसिंग सिसोदिया, 
मनसे, शिरपूर ९८५०२७९२२२ 

No comments:

Post a Comment